सिन्नर : मऱ्हळ येथील समृद्धीच्या साईटवर वाहनाखाली सापडून कामगाराचा मृत्यू
स्थानिक बातम्या

सिन्नर : मऱ्हळ येथील समृद्धीच्या साईटवर वाहनाखाली सापडून कामगाराचा मृत्यू

Gokul Pawar

सिन्नर : तालुक्यातील मऱ्हळ येथे सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामावर देखरेखीसाठी असलेल्या २० वर्षीय युवकाचा ग्राइंडर मशीनखाली सापडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. २९) रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली.

जनार्दन भास्कर लगड २० रा. शिंगणापूर कोपरगाव हा युवक समृद्धी महामार्गाच्या कामावर दिलीप बिल्डकॉन मध्ये कार्यरत होता. रात्री काम सुरू असताना ग्राइंडर मशीनचा धक्का लागून तो चाकाखाली सापडला. मशीन मागे घेत असताना चालकाच्या लक्षात न आल्याने हा अपघात झाला.

अपघातानंतर सहकाऱ्यांनी व परिसरातील ग्रामस्थांना जखमी अवस्थेतील जनार्दनला दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. तेथे डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. संतोष कुरहे यांच्या फिर्यादीवरून वावी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

२ लाख आपत्कालीन सहाय्य

या अपघातात मृत पावलेल्या जनार्दनच्या पश्चयात आई वडील असून घरात तो एकटाच कमावता होता.

या प्रसंगात त्याच्या कुटुंबियांना आपत्कालीन सहाय्य म्हणून दिलीप बिल्डकाँनच्या वतीने २ लाखांची मदत करण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत त्याच्या आई वडिलांच्या नावे प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश दिला जाईल.

तसेच २५ लाखांच्या अपघात विम्याचा देखील लाभ देण्यात येईल अशी माहिती दिलीप बिल्डकॉचे उपव्यस्थापक सुनील तोमर यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com