मिशीचा आकडा नको ग बाई मला, ‘नथीचा नखरा’ हवा गं; सोशल मीडियात नवा ट्रेंड
स्थानिक बातम्या

मिशीचा आकडा नको ग बाई मला, ‘नथीचा नखरा’ हवा गं; सोशल मीडियात नवा ट्रेंड

Gokul Pawar

नाशिक : लॉकडाऊन च्या कालावधीत एकना अनेक चॅलेंज सोशल मीडियात ट्रेंडिंगवर होते. आता नव्यानेच बायकांमध्ये नथीचा नखरा हा ट्रेंड व्हायरल होऊ लागला आहे.

सध्या देशभरात कोरोनाचा वाढता प्रभाव त्यामुळे देशात चौथा लॉक डाऊन चा काळ सूरी आहे. या दोन अडीच महिन्याच्या कालावधीत अनेक ट्रेंड पहायला मिळाले. कुंकिंगपासून ओल्ड फोटो, ते विदाऊट मेकअप पर्यत अनेक ट्रेंड व्हायरल झाले. आता नवा ट्रेंड बायकांमध्ये रुजू झाला आहे तो म्हणजे ‘नथीचा नखरा’ होय.

स्त्री सौंदर्य खुलवणाऱ्या ‘नथीचा नखरा’ या चॅलेंजने सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच वेड लावले आहे. सोशल मिडियावर कशालाही प्रसिद्धी मिळते. आता नथीचा नखरा हा ट्रेंड जोरदार सुरु आहे.

काय आहे हा ट्रेंड?

नथीचा फोटो व्हाट्सएप स्टेटसला टाकून आपल्या मैत्रिणींना याद्वारे चॅलेंज दिले जाते. चॅलेंज स्वीकारून आपल्या मैत्रिणीनं ते फोटो स्टेटसला ठेऊन इतर मैत्रिणींना ते चॅलेंज स्वीकारण्यास सांगणे, अशा आशयाचा ट्रेंड सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

व्हाट्सप, फेसबुक, इन्स्टाग्रामचे स्टेटस आता नथींच्या फोटोनी भरून गेले आहेत. महिलावर्गाची या ट्रेंडला जोरदार पसंती मिळत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com