पायी चालणाऱ्या महिलेने भर रस्त्यात दिला बाळाला जन्म; नाशिक येथून मध्य प्रदेश जातांना घडली घटना

पायी चालणाऱ्या महिलेने भर रस्त्यात दिला बाळाला जन्म; नाशिक येथून मध्य प्रदेश जातांना घडली घटना

नाशिक : शहरातून मध्य प्रदेशातील सतना या आपल्या मूळ गावी पायी परतत असताना एका गरोदर महिलेची प्रसूती झाली आहे. या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला असून बाळ व आई सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

शकुंतला असे या महिलेची नाव असून हे तिचे चौथे आपत्य आहे. याबाबत सेंधवा पोलिस ठाण्याचे निरीक्षक व्ही. एस. परिहार यांनी माहिती दिली. भररस्त्यात या महिलेला प्रसूती वेदना सुरु झाल्या आणि रस्त्यातच तिची प्रसूती झाली.

शकुंतला या नाशिक मध्ये आपल्या परिवारासोबत राहतात. मात्र त्यांचे मूळ गाव हे मध्य प्रदेश येथील आहे. लॉक डाऊन मध्ये अडकून पडल्याने त्यांनी कुटुंबासोबतच पायी जाऊन मूळ गावी परतण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या कुटुंबासोबत त्यांनी प्रवास सुरु केला.

नाशिक आणि धुळे याच्या मध्ये असताना त्यांना प्रसूती वेदना सुरु झाल्या आणि तिथेच त्यांनी बाळाला जन्म दिला. कुटुंबातील महिलांनी या महिलेची भर रस्त्यात प्रसूती केली सुदैवाने यात नवजात बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहेत.

दरम्यान, प्रसूतीनंतर हे कुटुंब बिजासन चेकपोस्ट येथे पोहचले, तिथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. इथून या कुटुंबाला मध्य प्रदेशाती मूळ गावी पार्ट पाठवण्यासाठी बसची सोय करून देण्यात आली आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com