पंचवटी पोलीस ठाण्याच्या गेटवर महिलेचा पेटवून घेण्याचा प्रयत्न

पंचवटी पोलीस ठाण्याच्या गेटवर महिलेचा पेटवून घेण्याचा प्रयत्न

पंचवटी : समाजात आपली नाचक्की होईल म्हणून तिच्या आईने पंचवटी पोलिस स्टेशनच्या प्रवेद्वाराजवळच अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने प्रचंड खळबळ उडाली. पोलिसांनी तिला विझविण्याचा प्रयत्न केला. तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, पंचवटी परिसरातील टकले नगर येथे संधू कुटुंबीय राहतात. या कुटुंबातील मुलीचे तीन वर्षांपूर्वी छतीसगड येथील रायपूर येथे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणाऱ्या राजविंदर पडडा याच्याशी लग्न जमले होते. १८ जानेवारी २०२० रोजी रायपूर येथे त्यांचा विवाह झाला. त्यानंतर अवघ्या आठ दिवसातच विवाहित मुलीचा नवरा हा तिला मारहाण करून छळू लागला. त्याच्या छळाला कंटाळून अखेर तिने दोन दिवसांपूर्वी रायपूर येथून पळ काढत थेट नाशिक येथील गंजमाळ येथे राहणाऱ्या आपल्या मैत्रिणीकडे आली. तिने हा प्रकार आपल्या मैत्रिणीला सांगितला.

रायपूर येथील सासरच्या मंडळींनी ती नवविवाहिता बेपत्ता झाल्याची नोंद केली. सदर प्रकार तिच्या आई-वडिलांना सासरकडून समजला. ती गंजमाळ येथील आपल्या मैत्रिणीकडे राहत असल्याचे समजले. त्या माहितीनुसार मुलीच्या आई-वडिलांनी या बाबत पंचवटी पोलिस ठाणे गाठून सदर प्रकार कथन केला. त्या अनुषंगाने पंचवटी पोलिसांनी त्या नवविवाहितेस चौकशीसाठी बोलावून घेतले. मात्र, मुलीने आई वडीलांकडे तसेच सासरी जाण्यास स्पष्ट नकार देत माझ्या आई वडिलांनी माझे मनाविरुद्ध लग्न करून दिले आहे. मला अडचण आणि त्रास होणार असल्याचे सांगूनही लक्ष दिले नाही, म्हणून मी कोणाकडे ही न जाता मी माझ्या मैत्रिणी सोबत राहून नोकरी करणार असल्याचे सांगत आपल्या आई-वडीलांना समवेत नातेवाईकांच्या समक्ष पोलिसंकडे लिहून दिले. त्यानंतर सदरील प्रकाराहून आई हरविंदर सिंग संधू ही व्यथित झाली.

पंचवटी पोलिस स्टेशनच्या प्रवेशद्वारावराजवळच स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतले. यात सदरील प्रकारात महिला ही गंभीर स्वरूपात भाजली असून तिला तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदरील घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त (गुन्हे) लक्ष्मीकांत पाटील, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त अमोल तांबे, परिमंडळ २ चे पोलीस आयुक्त विजय खरात पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये आले.

पंचवटी पोलिस स्टेशनच्या प्रवेशद्वारावरच एक महिला स्वतःला पेटवून घेत असल्याचे बघताच कुठलीही प्रकारची जीवाची पर्वा न करता जळत असलेल्या महिलेकडे धाव घेत पोलिस हवालदार शिवराम खांडवी यांनी तिला विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आग विझवून तिला वाहनातून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com