देवळाली कॅम्प : राहुरी येथे विजेचा शॉक लागून महिला ठार
स्थानिक बातम्या

देवळाली कॅम्प : राहुरी येथे विजेचा शॉक लागून महिला ठार

Gokul Pawar

देवळाली कॅम्प : पोलीस हद्दीतील राहुरी येथे आज सकाळी सात वाजेच्या सुमारास विजेचा शॉक लागून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. यशोदा द्यानेश्वर पवार (४५) असे या महिलेचे नाव आहे.

सकाळच्या सुमारास यशोदा ह्या पोल्ट्री फार्म जवळ गेल्या असता पावसामुळे वीज प्रवाह पाण्यात उतरल्याने त्यांना जोरदार शॉक लागला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Deshdoot
www.deshdoot.com