टाकळी फाटा नजीक दुचाकी अपघातात महिलेचा मृत्यू
स्थानिक बातम्या

टाकळी फाटा नजीक दुचाकी अपघातात महिलेचा मृत्यू

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक। भरधाव दोन दुचाकींच्या झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना टाकळी फाटा येथील शंकर नगरकडून घोडेस्वार बाबा दर्ग्याकडे जाणार्‍या मार्गावर शुक्रवारी (दि.13) दुपारी घडली.

सविता जितेंद्र शर्मा (30, रा. आगर टाकळी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी जितेंद्र आर. शर्मा यांनी तक्रार दाखल केली असून त्यांच्या फिर्यादीनुसार ते पत्नी सविता व मुलगी इशिता सोबत एमएच 15 डीपी 6678 क्रमांकाच्या दुचाकीवरुन शुक्रवारी दुपारी जात होते.

त्यावेळी अज्ञात दुचाकीचालकाने भरदाव दुचाकी चालवून शर्मा यांच्या दुचाकीस धडक दिली. त्यात शर्मा दाम्पत्य जखमी झाले. मात्र गंभीर मार लागल्याने सविता यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर संशयित दुचाकीस्वार फरार झाला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com