त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालया समोर रेशन न मिळणाऱ्या नागरिकांचे उपोषण
स्थानिक बातम्या

त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालया समोर रेशन न मिळणाऱ्या नागरिकांचे उपोषण

Gokul Pawar

Gokul Pawar

त्र्यंबकेश्वर : येथील तहसील कार्यालयासमोर श्रमजीवी संघटने कडून हक्काग्रह आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा हा तिसरा दिवस असून रेशन न मिळणाऱ्या नागरिकांकडून आंदोलन करण्यात येत आहे.

दरम्यान लॉक डाऊन च्या काळातराज्यातील शिधापत्रिका धारकांना मोफत अन्नधान्य मिळत आहे. तर ज्यांच्याकफे रेशन कार्ड नाही अशा नागरिकांही मोफत अन्नधान्य देणे, असा आदेश राज्य शासनाकडून देण्यात आले आहे.

परंतु तालुक्यातील अनेक गावांना या सुविधेचा लाभ मिळाला नसल्याची तक्रार लाभार्थ्यांनी केली आहे. मागील तीन दिवसांपासून रोज ४५ ते ५० लोक हे आंदोलन करीत असून आज तिसरा दिवस आहे. या आंदोलनकर्त्यांनी याबाबतचे निवेदनही तहसीलदार यांना दिले आहे. दरम्यान यात आदिवासी समाज बांधव भगिनी सामील असून श्रमजीवी संघटनेचे झेंडे घेऊन तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आंदोलन कर्ते बसले आहेत.

रेशन कार्ड नसलेल्या कुटुंबाना अंत्योदय व प्राधान्य रेशन कार्ड द्यावे रोजगार हमी कामे सुरू करावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. यात अंजनेरी, वावी हर्ष, मुळेगाव या भागातील लोक आज तिसऱ्या दिवशी आंदोलनात सामील होते. साधारण दोन हजार च्या आसपास लाभ न मिळालेल्या नागरिकांची संख्या आहे, अशी माहिती श्रमजीवीचे तालुका अध्यक्ष भगवान डोखे व सचिव तानाजी शीद दिली.

Deshdoot
www.deshdoot.com