लासलगाव : खाकी वर्दीतला माणूस प्रेमाने घास भरवतो तेव्हा….

लासलगाव : खाकी वर्दीतला माणूस प्रेमाने घास भरवतो तेव्हा….

लासलगाव : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पोलीस दंडूक्याचा प्रसाद देत आहेत.

अशातच लासलगाव येथे बुधवारी पोलीस कर्मचारी कैलास महाजन, आहिरे यांनी भुकेने व्याकूळ असलेल्या वृद्ध इसमा जवळ जाऊन चौकशी करत पोटभर जेवण आणि पाणी देऊन माणुसकीचे दर्शन घडविले आहे.

लासलगाव पोलीस आपल्या कर्तव्यात मग्न असताना भुसावळ येथील एक वयस्कर इसम बँक ऑफ बडोदा समोरील झाडाजवळ बसलेले होते. यावेळी लासलगाव पोलीस ठाण्याचे कैलास महाजन, आहिरे यांनी त्यांना विचारपूस केली.

यावर त्या वृद्धाने पाणी पाहिजे विचारणा केली. त्यानंतर लागलीच त्यांनी या वृद्धास पाणी आणि जेवण देत माणुसकीचे दर्शन घडविले.

लासलगाव मध्ये कोरणाचा रुग्ण आढळल्याने गेल्या चार दिवसांमध्ये संपूर्ण परिसर हा कडेकोड बंद आहे त्यामुळे सर्वसामान्यबरोबर अनेकांचे हाल होत आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com