देवळा : धावत्या एसटीचे चाक निखळले; चालकाच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला
स्थानिक बातम्या

देवळा : धावत्या एसटीचे चाक निखळले; चालकाच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला

Gokul Pawar

Gokul Pawar

देवळा : मेशी बस दुर्घटनेची घटना ताजी असतांनाच देवळा येथे बसचे चाक अचानक निखळून पडत असतांनाच चालकाने प्रसंगावधान दाखवून वेळीच बस थांबविल्यामुळे मोठा अनर्थ टळला. यावेळी बसमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह ६५ ते ७० प्रवासी होते.

दरम्यान सोमवार (दि.२४) रोजी सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सटाणा आगाराची देवळा – वाखारी कापराई ही चक्री बस (MH- 20 D 9341) वाखारी येथून देवळ्याकडे येत होती. देवळा येथील कोलथी नदीवरील पुलावर असलेल्या भाजीमंडई जवळच्या उतारावर अचानक बसचे मागील चाक निखळून बाहेर येऊ लागले. ही बाब चालक व्हि.बी. आहेर यांच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत त्वरीत बस उभी केली.

चाक पूर्णपणे निखळून पडले असते तर मोठा अनर्थ झाला असता, परंतु चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. यावेळी बसमध्ये देवळा येथे महाविद्यालयीन व शालेय शिक्षणासाठी येणाऱ्या विद्याथ्र्यांसह ६५ ते ७० प्रवासी होते. वाहतूक नियंत्रक व्ही.एन. गोसावी, बसचालक पांडुरंग पवार व प्रवाशांनी चालक आहेर यांचे अभिनंदन केले आहे

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com