त्र्यंबकेश्वर : ग्रहणाच्यावेळी नगरपालिकेने पाणी पुरवठा ठेवला बंद; अंनिसची हरकत

त्र्यंबकेश्वर : ग्रहणाच्यावेळी नगरपालिकेने पाणी पुरवठा ठेवला बंद; अंनिसची हरकत

नाशिक : ग्रहणकाळात हे करू नये ते करू नये अशा अनेक प्रथा परंपरा पाळल्या जातात. परंतु त्र्यंबकेश्वर नगरपालिकेने थेट पाणीपुरवठाच बंद केल्याने अंनिसने कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान काल दि. २६) रोजी भारताच्या काही भागातून कंकणाकृती सूर्यग्रहण तर काही ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याची संधी अनुभवायास मिळाली. परंतु याबाबत असणाऱ्या गैरसमज अद्यापही लोकांच्या डोक्यातून गेले नसल्याचे उत्तम उदाहरण या ठिकाणी पाहावयास मिळाले. येथील त्र्यंबकेश्वर नगरपालिकेने थेट शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे आदेश दिले. यानंतर खरोखरच ग्रहणकाळात पाणीपुरवठाच बंद ठेवला. ग्रहणकाळ संपल्यानंतर शहराला पाणीपुरवठा सुरु केला.

येथील नगरसेवकांनी याबाबत व्हॅट्सऍपवर मॅसेज व्हायरल करण्यात आले. ग्रहणकाळात पाणी वापराने निषिद्ध असल्याचे संदेश व्हायरल करीत पाणी पुरवठा बंद केला. यामुळे अंनिसने हरकत घेत चौकशीची मागणी केली असून असे असेल तर धरणातील पाणी सोडून द्या? असे टोलाही अंनिसने लगावला आहे. यामुळे त्र्यंबकेश्वर नगरपालिकेचा हा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com