नाशिकरोड : देवळाली परिसरात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिकरोड : देवळाली परिसरात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिकरोड : येथील देवळाली गाव परिसरात असलेल्या आठवडे बाजार जवळील सुंदर नगर येथे अज्ञात टोळक्याने वीस ते पंचवीस वाहनाचे नुकसान करून तोडफोड केल्याची घटना घडली आहे. तसेच आजुबाजुच्या घरावरही दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

दरम्यान देवळाली परिसरात रात्रीच्या सुमारास अज्ञात टोळक्याने वाहनांच्या काचा फोडत घरांचीही तोडफोड करण्यात आली आहे. सदरचा प्रकार पूर्ववैमनस्यातून घडला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहकले, सहकार्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com