सिन्नर : वावीकरांनी स्वयंस्फूर्तीने पाळला शंभर टक्के लॉकडाऊन

सिन्नर : वावीकरांनी स्वयंस्फूर्तीने पाळला शंभर टक्के लॉकडाऊन

वावी : कोरोना विषाणू संसर्गामुळे सर्वत्र जनजीव न भयभीत झाले आहे. मात्र, असे असताना ग्रामस्थांकडून खबरदारी घेतली जात नसून बिनदिक्कतपणे आपले व्यवहार सुरू ठेवण्याला अनेक जण प्राधान्य देत आहेत.

त्यामुळे विशेषाधिकाराचा वापर करून कोरोना प्रतिबंधक दक्षता समिनी व ग्रामविकास अधिकारी यांच्या सूचनेनुसार दि.१५ पासून वावीकरांनी स्वयंस्फूर्तीने शंभर टक्के लॉकडाऊन पाळण्यास प्रारंभ केला आहे. भाजीपाला विक्रीसह किराणा दुकाने बंद ठेवण्यात आल्यामुळे गावात सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे.

या लॉक डाऊन च्या कालावधीत गावातील एकही नागरिक अनावश्‍यक रित्या घराबाहेर पडणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. सकाळी साडेसात वाजेपर्यंत दूध संकलन केंद्राचे काम आटोपण्यात येते. किराणा दुकाने, भाजीपाला विक्री, पीठ गिरण्या देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. केवळ आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवांशी निगडित आस्थापना सुरू ठेवण्यात आल्या आहेत.

शासनाने लॉक डाऊनचा कालावधी वाढवून दिला याचा अर्थ परिस्थिती नियंत्रणात असली तरी गंभीर आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे अनावश्यक रित्या घराबाहेर पडणे प्रत्येकाने स्वतःहून टाळले पाहिजे. ग्रामपंचायत क्षेत्रात तोंडाला मास्क, रुमाल न बांधता फिरणाऱ्यांवर शंभर रुपये दंड व संचारबंदी भंगाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा ग्रामविकास अधिकारी परेश जाधव यांनी दिला आहे.

सरपंच नंदा गावडे, उपसरपंच सतीश भुतडा, माजी सरपंच विजय काटे, सह्ययक पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्यासह व्यापारी संघटना प्रतिनिधी लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

चाळीस स्वयंसेवकांचा गावातील रस्त्यांवर पहारा
वावी ग्रामपंचायतीने तीन दिवस १०० टक्के लॉक डाऊन पाळण्याचा निर्णय घेतल्यानंतर कोरोना दक्षता समितीन गावात येणारे सर्व अंतर्गत रस्ते बंद केले आहेत. गावात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर सुमारे ४० स्वयंसेवक खडा पहारा देत होते.

गावात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी केली जात आहे. त्याचबरोबर गावातील कोणत्याही व्यक्तीला गावाबाहेर सोडले जात नाही केवळ वैद्यकीय कामासाठी आणि बँक व्यवहारासाठी काही प्रमाणात सवलत दिली जाते. कोरोना दक्षता समितीचे अध्यक्ष विजय काटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ४० स्वयंसेवक यासाठी कार्यरत आहेत .

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com