कोरोनाची कॉलर ट्यून बंद करण्यासाठी ‘ही’ ट्रिक वापरा
स्थानिक बातम्या

कोरोनाची कॉलर ट्यून बंद करण्यासाठी ‘ही’ ट्रिक वापरा

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून प्रत्येकाच्या मोबाईलवर खोकल्याची कॉलर ट्यून ऐकायला मिळते आहे. यामुळे प्रत्येकजण वैतागला असेल पण काळजी करू नका, यावर उपाय सापडला असून कॉलर ट्यून वाजल्यास हॅश दाबून आपण कॉल उचलून न कोणत्याही अडथळ्याविना बोलू शकता.

दरम्यान ‘करोना’च्या पार्श्वभूमीवर काय काळजी घ्यावी, याबाबत माहिती देणारी कॉलर ट्यूनच काही टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या ग्राहकांच्या मोबाइलवर ऍक्टिव्ह केली आहे. जनजागृती करण्यासाठी ही कॉलर ट्यून उपयोगी ठरत असली तरी खोकल्याच्या आवाजाने होणारी सुरुवात अनेकांना आवडलेली नाही. यावर उपाय सापडला असून यामुळे या कॉलर ट्युनच्या त्रासापासून वाचता येणार आहे.

जगभर धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरस बाबत नागरिकांमध्ये जन्जग्रुती व्हावी यासाठी ही कॉलर ट्यून ऍक्टिव्हेट करण्यात आली आहे. अफवांमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण होत असल्याने सातत्याने या रींगटोनच्या माध्यमातून प्रचार प्रसार केला जात आहे.

अशी आहे कॉलरट्यून

कॉल लावल्यानंतर सर्वात प्रथम खोकल्याचा आवाज येतो, व ‘करोना’ व्हायरस पसरण्यापासून रोखता येऊ शकतो. खोकताना व शिंकताना नेहमी आपल्या नाकातोंडावर रुमाल अथवा टिश्यू पेपर धरा. हात नियमितपणे साबणाने स्वच्छ धुवा. हाताने वारंवार नाक व तोंडाला स्पर्श करू नका. एखाद्याला श्वसन, सर्दी व खोकल्याचा त्रास होत असेल तर अशा व्यक्तीपासून कमीतकमी एक मीटर अंतर बाळगा. गरज पडल्यास जवळच्या रुग्णालयात जा, किंवा हेल्पलाइन नंबरवर संपर्क करा, अशा आशयाची माहिती ऐकू येत आहे.

मोबाईल कंपन्या कॉलर ट्यून लावतात किंवा आपण सुद्धा कॉलर टोन सेट करू शकतो. पण सध्या प्रत्येकाच्या मोबाईलवरती कॉलर ट्यून सेट असल्याने आपल्याला बदलणाया वाव नाही. त्यामुळे आपल्याला योग्य बटन जर आपण लागले आणि सुरक्षित राहून झटपट कामे करू शकतो. त्यासाठी कॉल लावल्यानंतर हॅश बटन प्रेस करावे. यानंतर लागलीच आपला कॉल कनेक्ट होईल.
-तन्मय स दीक्षित, सायबर तज्ञ

Deshdoot
www.deshdoot.com