अन मांडवाच्या दारी वाजले ‘मुबारक हो तुमको ये शादी तुम्हारी’; शहर पोलिसांच्या नवदांपत्यास अनोख्या शुभेच्छा

अन मांडवाच्या दारी वाजले ‘मुबारक हो तुमको ये शादी तुम्हारी’; शहर पोलिसांच्या नवदांपत्यास अनोख्या शुभेच्छा

नाशिक : देशभरात लॉक डाऊन असल्यामुळे विवाह समारंभ, धार्मिक विधी तसेच इतरही कार्यक्रम बंद आहेत. अशातच नाशिक पोलिसांनी एका नवदाम्पत्यास अनोख्या शुभेच्छा देत त्यांचा विवाह संस्मरणीय केला आहे.

झालं असं, गुजरात येथील निकुंज आणि नाशिक येथील हरिणी जोशी यांचा विवाह पूर्व नियोजित ठरलेला होता. परंतु लॉक डाऊन असल्याने विवाहास लांबणीवर होता. यासाठी निकुंज याने गुजरात सरकारची परवानगी घेत एकटाच वधूच्या निवासस्थानी नाशिकमधील अशोक मार्ग परिसरात आला. विवाहाची तयारी झाली असल्याने या विवाह प्रसंगी हरणीच्या घरचे सदस्य सहभागी होते तर निकुंजच्या घरचे सदस्य व्हिडिओ कॉल वरून सहभागी झाले होते. या अनोख्या विवाहाची माहिती नाशिक पोलिसांना मिळताच त्यांनी वधूचे विवाहस्थळ गाठले.

दरम्यान पोलिसांनी जोशी कुटुंबीयांच्या निवासस्थानी सोशल सोशल डिस्टसिंग राखून वधूवरांना इमारतीच्या खालूनच शुभेच्छा देत दिल्या. यावेळी त्यांच्या भावी आयुष्यासाठी हा मैने भी प्यार किया है या चित्रपटातील ‘मुबारक हो तुमको ये शादी तुम्हारी’ हे गाणे वाजून टाळ्यांच्या गजरात त्यांचा विवाह संस्मरणीय केला

असा अनोखा विवाह सोहळा शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते वरिष्ठ पोलीस निरीक्षक आचल मुद्गल सुनील रोहोकले यांच्यासह इतर पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या विवाहाला आगळ्या वेगळ्या शुभेच्छा दिल्या.

Last updated

Deshdoot
www.deshdoot.com