सुरगाणा येथे सामाजिक अंतर राखून पार पडला अनोखा विवाह सोहळा
स्थानिक बातम्या

सुरगाणा येथे सामाजिक अंतर राखून पार पडला अनोखा विवाह सोहळा

Gokul Pawar

Gokul Pawar

सुरगाणा : येथील देवरे व भामरे कुटुंबीयांनी सामाजिक अंतर राखत प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत विवाह सोहळा संपन्न केला.

ऐन लग्नसराईच्या मोसमात करोनाने धुमाकूळ घातल्याने अनेक विवाहेच्छुकांचे विवाह रखडले आहेत. तर करोनाचा फैलाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे काही जणांचे ठरलेले विवाहसोहळे अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडले आहेत.

दरम्यान, या अशा अडचणीच्या परिस्थितीतून मार्ग काढत अनेकजण मंगलकार्य घडवून आणत आहेत . असाच एक विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला.

वराती, बँडबाजा, पै पाहुणे, मानपान, जेवणावळी असला पारंपरिक लग्नातील कुठलाच थाटमाट न करता हा विवाह सोहळा पार पडला. वधू – वर, भटजी आणि प्रशासनाच्या नियमाप्रमाणे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हे शुभमंगल पार पडले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com