लाचप्रकरणी जिल्हा परिषदेचे दिन सेवक निलंबित
स्थानिक बातम्या

लाचप्रकरणी जिल्हा परिषदेचे दिन सेवक निलंबित

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । पांगरी (ता. सिन्नर) येथील वाईन शॉपसाठी ग्रामपंचायत विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केलेल्या दोन सेवकांना जिल्हा परिषद प्रशासनाने मंगळवारी (दि.24) निलंबित केले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी या सेवकांचा अहवाल जिल्हा परिषदेकडे सुपुर्द केला होता. त्याआधारे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी ही कारवाई केली आहे.

ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रदीप बागूल यांनी दिलेल्या माहितीनुसार लाचेची रक्कम स्वीकारताना वरीष्ठ सहाय्यक बाळू बोराडे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या दोघाही सेवकांना गुरुवार (दि.19) रोजी अटक करण्यात आली होती.

तक्रारदारास बियर शॉपी सुरू करण्यासाठी परवाना मिळविण्याकामी ग्रामपंचायत विभागाच्या ना हरकत दाखल्याची आवश्यकता होती. हा दाखला मिळाल्यानंतरच तक्रारदाराला राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परवाना मिळणार होता. हा दाखला देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे 12 हजार रूपयांची मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर ग्रामपंचायत विभागात सापळा रचण्यात आला होता.

Deshdoot
www.deshdoot.com