PhotoGallery : देवळाली कॅम्प : उसाच्या शेतात वीस दिवसांचे बिबट्याचे बछडे आढळले

jalgaon-digital
1 Min Read

देवळाली कॅम्प : वडनेर दुमाला येथे मंगळवारी (दि. २१) रोजी शेतकऱ्याच्या मळ्यात दोन बछडे आढळून आले होते. यावेळी बछडे मादीच्या स्वाधीन करण्यासाठी कॅरेटमध्ये ठेवण्यात आले होते. आज पहाटेच्या सुमारास या दोन्ही बछड्यांना मादी घेऊन गेल्याचे स्थानिकांनी सांगितले.

वडनेर दुमाला येथील वडनेर रोडच्या रेंज रस्त्यावरील त्र्यंबक पोरजे यांच्या मळ्यात ऊस तोडणी सुरू असताना दोन बछडे आढळून आले आहे होते.  प्रारंभी ऊस तोडणी कामगारांना ही मांजरीची पिल्ले असल्याचे जाणवले मात्र नीट पाहिले असता ही बिबट्याचे पिल्लू असल्याचे लक्षात आले.

त्यानंतर शेतकऱ्यांनी याबाबत येथील नगरसेवक केशव पोरजे यांना माहिती दिली. त्यांनी तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. यावेळी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, वनपरिमंडळ अधिकारी मधुकर गोसावी, वनरक्षक गोविंद पांढरे यांसह कर्मचारी तात्काळ घटनास्थळी हजर झाले.

त्यांनी या बिबट्याच्या पिलांना सुरक्षित बाहेर काढत बछडे मादीच्या स्वाधीन करण्यासाठी उसाच्या शेतात एका कॅरेटमध्ये ठेवले. यानंतर बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास या दोन बछड्यांना मादीने सुखरूप घेऊन गेल्याने स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. .

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *