शहरात दोघांच्या आत्महत्या; १४ वर्षीय मुलाचा समावेश
स्थानिक बातम्या

शहरात दोघांच्या आत्महत्या; १४ वर्षीय मुलाचा समावेश

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । शहरात दोन विविध घटनांमध्ये एक वृद्ध तर अवघ्या 14 वर्षाच्या मुलाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

सईद अहमद महंमद वसीम अन्सारी (53, रा. आयशर रेसिडेन्सी, हॅपीहोम कॉलनी, पखालरोड) यांनी रविवारी राहत्या घरामध्ये ओढणीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबईनाका पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

तर जाधव संकुल परिसरातील समर्थ केंद्राजवळ राहत असलेल्या 14 वर्षीय मोहित लोटन महाजन या मुलाने रविवारी राहत्या घरामध्ये सुताच्या दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. आत्महत्येमागील कारण अस्पष्ट आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com