इंदिरानगर : पांडवलेणीवर अडकलेल्या दोन युवकांची सुखरूप सुटका
स्थानिक बातम्या

इंदिरानगर : पांडवलेणीवर अडकलेल्या दोन युवकांची सुखरूप सुटका

Gokul Pawar

इंदिरानगर : पांडवलेणीवर ट्रेकिंग करत असताना अडकलेल्या दोघे युवकांना इंदिरानगर पोलीस ठाण्याचे बीट मार्शलसह क्यूआरटी टीमने सुखरुप ‘रेस्क्यू ‘करून खाली आणले.

दरम्यान शुक्रवारी (दि. २०) सकाळी पांडवलेणीवर यश बोरसे (१८) व गणेश बोरसे (१९) हे दोघेही आपल्या मित्रांसमवेत पांडवलेणी येथे ट्रेकिंगसाठी सकाळी सात वाजेच्या सुमारास डोंगरसर करून टोकावर गेले. परंतु उतरण्यासाठी मार्ग न सापडल्याने डोंगरावर अडकले एका इसमाने पोलीस मुख्यालयात कळवले.

घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट मार्शल परमेश्वर महाजन व सुधीर वसावे, त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी डोंगरावरील दोघांनी काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर क्युआर टीमला बोलविण्यात आले.

त्यानंतर टीमचे पोलीस उपनिरीक्षक समाधान हिरे यांच्यासह इतर सहकाऱ्यांनी यांनी सुमारे चार तास रेस्क्यू ऑपरेशन करून दोघांना डोंगराच्या टोकावरून खाली आणले

Deshdoot
www.deshdoot.com