पेठ : ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने दोन मोटरसायकलचा चुराडा
स्थानिक बातम्या

पेठ : ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने दोन मोटरसायकलचा चुराडा

Gokul Pawar

Gokul Pawar

पेठ : नाशिक -पेठ मार्गावर पेठ शहरातील अत्यंत वर्दळीच्या चौकात ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्यालगत असणारी दोन मोटरसायकलचा चुराडा झाला. सुदैवाने कुठलेही जिवीतहानी झाली नाही .

या बाबतचे वृत्त असे की पुणे येथील किशोर पारकर यांचे मालकीचा ट्रक क्र .एमएच १२, एआर २२९५ सोलापूरहून ऑइल पिंपे भरून बडोदा येथे जात असतांना पेठ शहरातील जुना तहसिल चौकात उमीया हार्डवेअर दुकानासमोर वाहन चालकाचा ताबा सुटला. यावेळी रस्त्यालगत उभी असणारी मोटरसायकल क्र .एमएच १५ एफ एक्स५६८८व एमएच १५जीजी ५१५० क्रमांकाच्या मोटरसायकल अक्षरशाः हा चिरडून टाकल्या.

यावेळी मोटरसायकल चालक शेजारील दुकानात प्लॅस्टीक खरेदीसाठी उतरले असल्याने थोडक्यात बचावले. या मार्गावर कायमच ट्रॅफीक जॅमची समस्या उद्भवत असतांना पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याने किरकोळ अपघात होत आहेत.

दरम्यान वाहन चालकास संतप्त नागरिकांनी चोप दिला असुन अपघाताचा गुन्हा दाखल होण्याचे सोपस्कार पाडले जात असले तरीही अश्या प्रकारावर प्रभावी उपाययोजना होणे आवश्यक आहे .

Deshdoot
www.deshdoot.com