नाशिकरोड : चेहडी नजीक भीषण अपघातात दोघांचा मृत्यू; एक जखमी
स्थानिक बातम्या

नाशिकरोड : चेहडी नजीक भीषण अपघातात दोघांचा मृत्यू; एक जखमी

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक  : चेहडी येथे गजानन पार्क समोर भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आदर्श कराड आणि आकाश गवळी अशी मृत तरुणांची नावे आहे.

नाशिक पुणे महामार्गावरील चेहेडी पंपीग खर्जुल मळा जाणाऱ्या रस्त्यावरील गजानन पाक अपाटमेंट समोरून एक ट्रक जात असताना तीन मोटरसायकल स्वार जात असताना अचानक डंपर खाली सापडले.  त्यात आदर्श रोहिदास कराड ( १७) आकाश गवळी (२२) हे दोघे जागीच ठार झाले आहे. तर ज्ञानेश्वर बाळू केदारे ( २४ ) गंभीर जखमी झाला आहे. जखमीस बिटको रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर डंपर चालक फरार झाला आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुरज बिजली,  वाहतूक निरिक्षक के.डी.पाटील यांनी धाव घेतली. दरम्यान नाशिक रोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. ठार झालेले युवक महाविद्यालयात शिक्षण घेत होते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com