सटाणा : ब्राम्हणगाव येथील हिरावाडी शिवारात गॅस सिलेंडरच्या स्फोटात दोन घरांचे नुकसान

सटाणा : ब्राम्हणगाव येथील हिरावाडी शिवारात गॅस सिलेंडरच्या स्फोटात दोन घरांचे नुकसान

सटाणा : ब्राह्मणगाव येथील हिरावाडी शिवारात गॅस सिलेंडरच्या स्फोटात दोन घरे जळून खाक झाली आहेत. यामध्ये साधारण दीड लाखांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान येथील आदिवासी वस्तीवर सकाळच्या सुमारास आदिवासी वस्तीतील स्वयंपाक चालू असताना अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे शेजारच्या घराने देखील पेट घेतला. या दोन घरांपैकी झूराबाई नागु पवार यांचे बोकड व बकऱ्या विक्रीचे सुमारे दीड लाख रुपये, धान्य व संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले. तर श्रावण कुवर यांच्या घरातील साठवलेले गहू, तांदूळ, बाजरीसह जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच बागलाण तालुक्याचे आमदार दिलीप बोरसे यांनी घटनास्थळी भेट देऊन दोन्ही कुटुंबाना संसारपयोगी साहित्य व जीवनावश्यक वस्तूची मदत केली. तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील, पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, ग्रामसेवक निंबा सोनवणे व तलाठी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com