Saturday, April 27, 2024
Homeनाशिकबागलाण : चाफ्याचे पाडे येथे आढळले दोन कोरोना संशयित रुग्ण; उपचारार्थ मालेगावात...

बागलाण : चाफ्याचे पाडे येथे आढळले दोन कोरोना संशयित रुग्ण; उपचारार्थ मालेगावात दाखल

डांगसौंदाणे : बागलाण तालुक्यातील चाफ्याचे पाडे येथील पती-पत्नी कोरोना संशयित वाटल्याने त्यांना मालेगावच्या सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

मुंबईला नोकरीनिमित्त राहणारे हे दांपत्य १४ दिवसांपूर्वी आपल्या मूळ गावी परतले आहे. मात्र गावी आले असताना कुठलेही नियम न पाळता आपल्या पारंपारिक शेतीव्यवसाय सह इतरत्र फिरत होते. आज सकाळी  दोघांपैकी एकाला चक्कर आल्याने डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

- Advertisement -

यावेळी रुग्णाची  पाश्वभूमी वैद्यकीय अधिकारीनी जाणून घेतली असता 14ते 15 दिवसांपूर्वी मुंबईहून आल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले याबाबत स्थानिक नागरिकांनी जागृत होत आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले.

संबंधित दाम्पत्याचा तपासणी अहवाल येईपर्यंत मालेगाव सामान्य रुग्णालयात हलविण्यात येत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ हेमंत अहिरराव यांनी दिली आहे. याबाबत प्रशासनाने पंचक्रोशीतील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देत खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

ग्रामीण आदिवासी भागात कलम १४४ लागू असताना अनेक लोक विनाकारण फिरतांना आढळून येत असल्याने प्रशासन वेळोवेळी सांगत असून ही याची काळजी घेतली जात नसल्याने असे लोक प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहेत.

जनतेने सहकार्य करून घरातच थांबण्याचा सूचना तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी केले आहे. तर या रुग्णाचे रिपोर्ट येईपर्यंत चाफ्याचे पाडे गावातील ग्रामस्थानी कुठे ही विनाकारण फिरू नये अन्यथा प्रशासनातर्फे कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सायंकाळी उशिरा पंचायत समितीचे अधिकारी नितीन देशमुख ग्रामसेवक बोरसे व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी चाफ्याचे पाडे गावास भेट देऊन योग्य ती खबरदारी घेण्याचा सूचना केल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या