त्र्यंबकेश्वर : करोनाच्या परिस्थितीत मंदिर बंद झाल्याने मोळी विकून उदरनिर्वाह
स्थानिक बातम्या

त्र्यंबकेश्वर : करोनाच्या परिस्थितीत मंदिर बंद झाल्याने मोळी विकून उदरनिर्वाह

Gokul Pawar

Gokul Pawar

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर मंदिरात काम करणाऱ्या एका कामगारास लाकडाची मोळी गावोगाव विकून उदरनिर्वाह करण्याची वेळ आली आहे.

सध्या ग्रामीण भागातील हातावर पोट असणाऱ्याला जिकरीचे संघर्ष करावा लागत आहे. रोजगार उपलब्ध होत नसल्याने उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत त्र्यंबबकेश्वर मंदिर परिसरात भाविकांना टीका(टिळा)देणाऱ्या या काशीनाथ शिद या माणसांवर उपासमारीचा प्रसंग ओढवला आहे.

त्र्यंबकेश्वर येथील महादेव मंदिराच्या आवारात काशिनाथ हे येणाऱ्या पर्यटकांना टीका लावण्याचे काम करीत. यातून त्यांना दिवसाला शंभर दीडशे रुपये मिळत. परंतु लॉक डाऊन च्या काळात मंदिरच बंद असल्याने यांच्यासह अनेकांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदुली पाडा येथील राहणारा काशिनाथ शिद आता लाकडाची मोळी विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे.

करोनामुळे त्र्यंबकेश्वर येथील मंदिर बंद झाल्याने काम बंद झाले. शेवटी जंगलात जाऊन लाकडाची मोळी आणून विकावी लागते. ज्या निसर्गात लहानचा मोठा झालो.त्याच निसर्गाने आज उपासमार थांबवली आहे
– काशिनाथ शिद

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com