त्र्यंबकेश्वर देवस्थानकडून ५१ लाखाची मदत

त्र्यंबकेश्वर देवस्थानकडून ५१ लाखाची मदत

त्र्यंबकेश्वर : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारची यंत्रणा सज्ज असून विविध उपपयोजना राबविण्यात येत आहे. अशा परिस्थितीमध्ये सामाजिक दायित्व ओळखून ५१ लाखाची मदत त्र्यंबकेश्वर देवस्थान कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आली.

दरम्यान देशासह राज्यावर सध्या कोरोना विषाणूचे संकट उभे ठाकले आहे. आजपर्यंतचा सर्वात वेगाने पसरणारा हा विषाणू असून याचा अटकाव करण्यासाठी राज्यशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. यासाठी विविध स्तरातून मदत केली जात आहे. येथील त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट कडून कोरोनास हरविण्यासाठी ५१ लाखाची मदत मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात आली.

यासाठीचा पत्र तथा निधी चेक त्र्यंबकेश्वर तहसीलदार दीपक गिरासे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. यावेळी विश्वस्त
संतोष कदम, पंकज भुतडा, प्रशांत गायधनी, तुप्ती धारणे उपस्थित होत्या.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com