त्र्यंबकेश्वर शहर गुरुवारपासून रविवारपर्यंत पुर्णतः लॉकडाऊन
स्थानिक बातम्या

त्र्यंबकेश्वर शहर गुरुवारपासून रविवारपर्यंत पुर्णतः लॉकडाऊन

Gokul Pawar

त्र्यंबकेश्वर : येत्या गुरुवार पासून ते रविवार पर्यंत शहर पूर्णतः बंद राहणार राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले असून या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे . दि.१६ एप्रिल ते १९ एप्रिल पर्यंत शहरात पूर्णतः लॉक डाऊन असणार आहे. या चार दिवसाच्या कालावधीत सर्व किराणा व भाजीपाला दुकाने बंद राहणार आहे.

याबाबतची माहिती त्र्यंबकेश्वर नगरपलिकेकडून देण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती प्राधिकरण नुसार हा आदेश जारी करण्यात आला आहे.

तहसीलदार दीपक गिरासे, नगरपालिका मुख्याधिकारी डॉ प्रवीण निकम, पो नो रामचंद्र कर्पे यावेळी उपस्थित होते. तसेच नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर किराणा असोसिएशनचे मांगीलालशेठ सारडा भाजीपाला विक्रते संघाचे दीपक लोखंडे आदी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com