त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा मद्य साठा जप्त

त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा मद्य साठा जप्त

त्र्यंबकेश्वर : लॉकडाऊनच्या काळात त्र्यंबक पोलिसांनी एकाच आठवड्यात दोनदा मद्य साठा पकडला आहे.

दरम्यान त्र्यंबक पोलीसांनी अवैध मद्य विक्री करणाऱ्यांविरुद्ध धाडसी कारवाई सुरू केलेली आहे. याबाबत त्र्यंबकेश्वर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वत्र लाँकडाऊन असल्याने जीवनाश्यक दुकाने सोडून सर्व दुकाने असून अशातच अवैध मद्यविक्री होत असल्याने पोलीसांनी कडक धोरण अवलंबले आहे.

दोन दिवसांपूर्वी अंबोली चेक पोस्टवर मद्य साठा जप्त केल्यानंतर आता वेळुंजे -ब्राम्हण वाडे रोडवर पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी अवैध मद्य विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. या कारवाईत टँग कंपनीची २४ डब्बे, ओसी ब्लू ४८ विदेशी मद्याच्या बाटल्या असा जवळपास ९७९२ रुपयांचा माल जप्त केला आहे.

याबाबत पोलीस शिपाई काकड यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. याप्रकरणी स्वप्नील सदाशिव विधाते रा.तिडके काँलनी, नाशिक, व दादा देवराम काकुळते रा.सिडको नाशिक यांच्या गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. अधिक तपास त्र्यंबकेश्वर पोलीस करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com