जिल्ह्यात करोनाग्रस्तांचा आकडा १८६८ वर; नव्याने ५१ रूग्णांची भर

जिल्ह्यात करोनाग्रस्तांचा आकडा १८६८ वर; नव्याने ५१ रूग्णांची भर

नाशिक : शहरात करोनाचा उद्रेक सुरुच असुन यासह ग्रामिण जिल्ह्यात करोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. आज जिल्ह्याभरात नव्याने ५१ रूग्णांची भर पडली. यात एकट्या नाशिक शहरातील ३६ मालेगाव शहरातील ४ व ग्रामिण भागातील १३ रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत करोना ग्रस्तांची संख्या १८६८ वर पोहचली आहे. तर आज दिवसभरात ३७ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनावर मात करणरांची संख्या १२२९ वर पोहचली आहे.

आज दिवसभरात जिल्हा प्रशासनास प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये एकट्या नाशिक शहरातील ३६ रुग्ण आहेत. यात फुलेनगर ३, पेठरोड ३, खडकाळी ४, कथडा २, कालिकानगर २, पखालरोड, गंजमाळ, चौक मंडई, अमृतधाम, साईधामरोड, मायको सर्कल, सारडा सर्कल, त्र्यंबक गेट, रविवार कारंजा, नवरंग कार्यालय, हनुमानवाडी, रोहिणीनगर, जुने नाशिक येथील प्रत्येकी १ या प्रमाणे रुग्ण आहेत.

प्रामुख्याने जुने नाशिकचा मोठा परिसर करोना संसर्गाने व्यापला आहे. तर रविवार कारंजा, मेनरोड अशा मुख्य बाजार पेठेतील रुग्ण आढळल्याने हा करोाचा उद्रेक अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मालेगाव शहरातील ४ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे मालेगाव शहराचा आकडा ८७० वर पोहचला आहे.

ग्रामिण भागातील आज १३ रूग्ण आढळून आले आहेत. यात येवला येथील ६, सिन्नर दोडी १, लखमापुर १, अोढा १, भगुर १ येथील असून यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा ३१९ झाला आहे. तर जिल्ह्यात आज तिघांचा मृत्यू झाला असल्याने एकुण मृत्यू झालेल्यांचा आकडा ११८ झाला आहे. तसेच जिल्ह्यात आज ३७ रुग्ण करोना मुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे करोनामुक्त होणारांचा आकडा १२२९ वर पोहचला आहे.

दरम्यान जिल्ह्यात आजपर्यंत १४ हजार ८४९ स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यातील १२ हजार ६१५ निगेटिव्ह आले आहेत, १८६८ पॉझिटिव्ह आले आहेत. यातील ४९८ रूग्ण उपचार घेत आहेत. तर अद्याप ३८९ अहवाल प्रलबिंत आहेत. अहवाल प्रलंबित राहण्याच्या प्रमाण वाढले असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

यामुळे मागील काही दिवसांचे अहवाल एकत्र आल्यानंतर एकदम करोनाग्रस्तांचा आकडा वढलेला दिसतो असे रूग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान आज नव्याने १६५ संशयित रूग्ण दाखल झाले आहेत. यात नाशिक शहरातील १३९, जिल्हा रूग्णालय २३, ग्रामिण भागातील ९४, मालेगाव ०५ संशयित रूग्णांचा सामावेश आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार
एकूण कोरोना बाधित : १८६८
मालेगाव : ८७०
नाशिक : ६०७
उर्वरित जिल्हा : ३१९
जिल्हा बाह्य : ७२
एकूण मृत्यू : ११८
करोनामुक्त : १२२९

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com