Saturday, April 27, 2024
Homeनाशिकजिल्ह्यातील आजपर्यंत ६७६ संशयितांची चाचणी कोरोना निगेटिव्ह, ९९ पॉझिटिव्ह; दोन रुग्ण...

जिल्ह्यातील आजपर्यंत ६७६ संशयितांची चाचणी कोरोना निगेटिव्ह, ९९ पॉझिटिव्ह; दोन रुग्ण कोरोनामुक्त

नाशिक | जिल्ह्यातील कोरोना संसर्गाबाबतची सायंकाळी ६ वाजेपर्यंतची माहिती जिल्हा सामान्य रूग्णालयामार्फत घोषित करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार ५१२ कोरोना संशयीतांचे अहवाल निगेटिव्ह असून केवळ ५६ रूग्णांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

श्री. मांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील ८०८ दाखल कोरोना संशयीतांच्या ८११ नमुन्यांची तपासणी आजतागायत करण्यात आली आहे, त्यातील ५१२ संशयीतांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत, तर ५६ रूग्णांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत, २४४ संशयीतांचे अहवाल प्रलंबित आहेत.

- Advertisement -

आज अखेर ४६७ संशयीत रूग्णांना तपासणीअंती आरोग्यदृष्ट्या सक्षम असल्याने घरी सोडण्यात आले आहे. लासलगाव येथील पहिला कोरोना रूग्ण बरा झाला असल्याने त्यासही घरी सोडण्यात आले आहे, तर जिल्ह्यातील कोरोना बाधित दोन रूग्णांचा मृत्यु झाला आहे. यांतील मालेगाव येथील एक रूग्ण धुळे वैद्यकीय महाविद्यालयात मृत झाल्याने त्याचा समावेश जिल्ह्यातील संसर्गित व मृतांमध्ये करण्यात आला आहे.

सद्यस्थितीत जिल्हा सामान्य रूग्णालयात ०७, नाशिक महानगरपालिकेच्या रूग्णालयात ०२, मालेगाव महानगरपालिका रूग्णालय ४६, शासकीय रूग्णालय, मालेगाव ०१ असे ५६ संसर्गित जिल्ह्यात आढळून आले आहेत, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कळविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या