देवळाली कॅम्प : दोनवड्यात बिबट्याने घेतला तीन वर्षीय बालकाचा बळी
स्थानिक बातम्या

देवळाली कॅम्प : दोनवड्यात बिबट्याने घेतला तीन वर्षीय बालकाचा बळी

Gokul Pawar

Gokul Pawar

देवळाली कॅम्प : भगूर जवळील दोनवाडे गावात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका तीन वर्षीय बालकाला आपला जीव गमवावा लागला आहे.

दरम्यान दोनवडे गावातील पप्पू शिरोळे यांच्या मळ्यालगतच्या वस्तीवर ही घटना घडली. आज (दि.०१) सायंकाळी या वस्तीवरील रुद्र राजू शिरोळे हा तीन वर्षीय बालक घराच्या ओट्यावर खेळत असताना बिबट्याने झडप घेऊन शेजारच्या ऊसाच्या शेतात घेऊन गेला.

शिरोळे परिवाराने आरडाओरडा केल्याने नागरिकांनी शेतात धाव घेतली. परंतु बिबटयाच्या हल्ल्यात रुद्रचा मृत्यू झाला होता. सदर घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com