मनमाडमध्ये एकाच दिवशी तीन करोना पॉझिटिव्ह; रुग्णांची संख्या नऊवर

मनमाडमध्ये एकाच दिवशी तीन करोना पॉझिटिव्ह; रुग्णांची संख्या नऊवर

मनमाड : शहरात आज (मंगळवार) आणखी तीन कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. यामुळे शहरातील बाधित संख्या नऊ झाली आहे.

दरम्यान काही दिवसा पूर्वी कोरोना मुक्त असलेल्या मनमाड शहरात आता अचानक करोना बाधीत रुग्णांची संख्या वाढू लागली असल्याने नागरिकांमध्ये चिंता वजा भीती निर्माण झाली आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये एकाच घरातील दोन पुरुष एक महिलेचा समावेश आहे. हे सर्व परवा आढळून आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मनमाड शहराला खेटून असलेले मालेगाव, चांदवड, येवला आणि लासलगावला करोनाचे रुग्ण आढळून आले होते असे असतांना देखील मनमाड शहर करोना मुक्त होते. मात्र अगोदर मालेगाव आणि त्यानंतर आता भुसावळ येथून आलेल्या रुग्णामुळे मनमाड शहरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

पाहता पाहता शहरात करोना बाधीत रुग्णांची संख्या नऊवर गेली आहे. त्यामुळे शहरात भीती पसरली आहे. ज्या भागात हे रुग्ण आढळून आले तो परिसर पालिका प्रशासनाने सील केला असल्याची माहिती मुख्यधिकारी डॉ. दिलीप मेणकर यांनी दिली

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com