नांदगावच्या `सेंट्रल किचन ‘मधून हजारो गरजू नागरिकांची भागते भुक….
स्थानिक बातम्या

नांदगावच्या `सेंट्रल किचन ‘मधून हजारो गरजू नागरिकांची भागते भुक….

Gokul Pawar

Gokul Pawar

नांदगाव : शहरातील अत्यंत गरजू नागरिकांना `सेंट्रल किचन ‘ मधून सकाळ व संध्याकाळ जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. साधारण दररोज सोळाशे नागरीकाकांची याद्वारे भूक भागवली जात आहे. नांदगाव तहसील कार्यालय, नगरपरिषद व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई कन्या विद्यालयात `सेंट्रल किचन ‘ मधून हा उपक्रम सुरू आहे.

कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर शहरातील अत्यंत गरीब घटकांची उपासमार होत असल्याने तहसील कार्यालयातील अधिकारी,नगरपरिषद व युवा फाउंडेशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १ मार्च पासून `सेंट्रल किचन ‘ उभारणी करण्यात आली. शहरातील अत्यंत गरजू नागरिकांना सिल बंदक रून जेवण स्वयंसेवक मार्फत गरजू नागरिकांना पोहचविण्यात येत आहे.

या कार्यात नगराध्यक्ष राजेश कवडे,आनंद महिरे,बंडू कायस्थ,सुमित सोनवणे,तुषार पाडे,संगिता सोनवणे, सचिन निकम,सफाई कामगार उतमेश चंडोले,महेंद्र भंगाळे, महेश पेवाल,यांच्यासह सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते जोमाने हे कार्य जोमाने करीत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com