त्र्यंबकेश्वर : वेळुंजे येथे चोरट्यांनी दुकान फोडले; ६५ हजाराचा ऐवज लांबवले
स्थानिक बातम्या

त्र्यंबकेश्वर : वेळुंजे येथे चोरट्यांनी दुकान फोडले; ६५ हजाराचा ऐवज लांबवले

Gokul Pawar

वेळुंजे : तालुक्यातील वेळुंजे येथील सदाशिव किराणा व कृषी केंद्र, व तसेच पीठ गिरणी या ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारून किमान ६५ हजारांचा ऐवज लंपास केला आहे सदरील घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात दिली आहे.

दरम्यान वेळुंजे येथील कोंडाजी बोडके हे रात्री दुकान बंद करून घरी गेले असता रात्रीचा फायदा उठवत चोरट्यांनी दुकानावर डल्ला मारला. दुकानाचे शटर तोडून गल्ल्यातून ६५ हजार रुपये लांबवले.

सकाळी जेव्हा हा प्रकार लक्षात आला तेव्हा सदरची माहिती पोलीस स्टेशनला देण्यात आली. यावेळी घटनास्थळी त्र्यंबकेश्वरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे, पोलीस हवालदार खैरनार व लोखंडे यांनी भेट देऊन सदरील प्रकारची माहिती घेतली तसेच कलम ४५७ व ३८० नुसार अज्ञाता विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे,

Deshdoot
www.deshdoot.com