नाशिकरोड : गुलाबवाडी येथे अज्ञात चोरट्याडून सव्वा दोन लाखाची चोरी
स्थानिक बातम्या

नाशिकरोड : गुलाबवाडी येथे अज्ञात चोरट्याडून सव्वा दोन लाखाची चोरी

Gokul Pawar

नाशिकरोड : येथील गुलाबवाडी परिसरात राहणाऱ्या एका तृतीयपंथी व्यक्तीच्या घरातून सुमारे रोख रकमेसह सव्वा दोन लाखाचा ऐवज चोरी झाल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात संजना महाले यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे

दरम्यान नाशिकरोड येथील गुलाबवाडी परिसरात राहणाऱ्या तृतीय पंथी व्यक्तीच्या घरातुन अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून एक लाख ९२ हजार रुपयाचे सोन्याचे दागिने व पंचवीस हजार रुपये रोख असा ऐवज चोरून नेला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com