Thursday, April 25, 2024
Homeनाशिकजगातल्या पहिल्या ‘रेसवेरा’ वाईनची निर्मीती नाशकात; खास जांभळापासून उत्पादन

जगातल्या पहिल्या ‘रेसवेरा’ वाईनची निर्मीती नाशकात; खास जांभळापासून उत्पादन

सातपूर : नाशिकच्या वाईनचा लौकिक जगभरात पसरलेला आहे द्राक्षाची पंढरी असलेल्या नाशिकला वाईन कॅपिटलचा बहुमानही देण्यात आला आहे. आता या नाशिकला जगातल्या पहिल्या जांभळा पासून तयार करण्यात आलेल्या रेसवेरा वाइनच्या उत्पादनातून नवा शिरपेच खोवला जाणार आहे.

विंचुर वाइन पार्कमध्ये गेल्या दिड वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करून रेसवेरा कंपनीने जांभळापासून वाईन निर्मिती केली आहे. जगातील हा पहिलाच प्रयोग असून इतर अनेक धान्यवर प्रयोग  करून वाईन निर्मिती झालेली आहे. मात्र जांभळा वरती पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात आला आहे. उद्योगाने पहिल्या टप्प्यात १८ हजार लिटर वाइन निर्माण केली आहे

- Advertisement -

ईएसडीएसचे संचालक पियुष सोमानी यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकारला गेला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज अग्रवाल व संस्थापक   संचालक निखील खोडे यांच्या मार्गदर्शनासह कॅनडातून बोलावण्यात आलेल्या वाईन तज्ञांच्या प्रयत्नाने उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता व बाजारातील अस्तित्व निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे. रेसवेरा वाईन ही जांभळाच्या अर्कापासून बनवली जाते ही मानवाच्या त्वचेला लकाकी देण्यासोबतच मधुमेह असणाऱ्या रुग्णांना ही लाभ देणारी आहे कॅन्सर होऊ नये यासाठी ही वाईन गुणकारी ठरणार आहे.

जांभळापासून वाईन निर्मिती हे स्वप्न आहे केवळ वाइन निर्माण करणे हाच उद्देश नाही तर ग्रामीण क्षेत्रासाठी रोजगाराची नवी संधी यातून निर्माण होणार आहे जंगली प्राण्यांमध्ये जांभळाच्या सेवनातून वर्षभराची रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होत असते. या अभ्यासाचा विचार करूनच या क्षेत्रात काम सुरू केले आहे.
-पियुष सोमानी संस्थापक रेसवेरा

- Advertisment -

ताज्या बातम्या