त्र्यंबकेश्वर : आठवड्यातून दोन दिवस भाजी बाजार बंद राहणार
स्थानिक बातम्या

त्र्यंबकेश्वर : आठवड्यातून दोन दिवस भाजी बाजार बंद राहणार

Gokul Pawar

Gokul Pawar

त्र्यंबकेश्वर : शहरात लॉकडाऊन अधिक तीव्र करण्यात आले असून आता आठवडे बाजार आठवड्यातून दोन दिवस बंद राहणार असल्याची माहिती भाजी विक्रेते संघाचे दिपक लोखंडे यांनी दिली आहे .

दरम्यान मध्यंतरी लॉक डाऊन शिथिल केल्यानंतर शहरातील बाजार पेठेत गर्दी झाल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.
तसेच भाजी मार्केट व परिसरात मोठी गर्दी वाढली होती.

शहरात दर मंगळवारी आठवडे बाजार भरत असतो. त्यामुळे परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन व भाजी विक्रेते यांच्यात चर्चा झाली आहे. परंतु अद्याप याबाबत निर्णय घेतला नसला तरी भाजी विक्रेते संघाने आठवड्यातून दोन दिवस भाजी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती भाजी विक्रेते संघाचे दिपक लोखंडे यांनी दिली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com