जिल्हा @१२२२ दिवसभरात ४८ रुग्णांची नोंद; शहराचा आकडा २१४ वर
स्थानिक बातम्या

जिल्हा @१२२२ दिवसभरात ४८ रुग्णांची नोंद; शहराचा आकडा २१४ वर

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : जिल्ह्यात आज दिवसभरात ४८ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली . तर यात शहरातील ३६ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे जिल्हा रुग्णसंख्येत भर पडली जिल्ह्याचा आकडा १२२२ वर गेला असून शहराचा आकडा २१४ वर गेला आहे.

दरम्यान नुकत्याच प्राप्त झालेल्या अहवालानुसार ही आकडेवारी देण्यात आली आहे. सायंकाळी आठ वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून यात शहरातील रुग्णांचा समावेश अधिक आहे. आजच्या वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे नाशिक जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा १२२२ वर पोहोचला आहे. तर शहरातील बाधितांची संख्या २१४ झाली आहे.

आज आढळून आलेल्या रुग्णांची अशी आहे हिस्ट्री 

सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास एकूण १४७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १४ अहवाल पॉझिटिव्ह आले. यात मालेगाव शहरातील ०९, संगमेश्वर ०४ तर एक नांदगाव तालुक्यातील रुग्णाचा समावेश आहे. तर आताच आलेल्या माहितीनुसार नांदगाव तालुक्यातील महिलेचा मृत्यू झाला आहे.

तर सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास शहहरातील अहवाल प्राप्त झाला. यात नव्याने २१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यात वडाळागाव येथे १०, पाथर्डी फाटा, वडाळानाका, विनयनगर येथे प्रत्येकी ०२ तर स्नेहनगर, अशोका मार्ग, गोसावीवाडी, कलानगर, लेखानगर याठिकाणी प्रत्येकी ०१ रुग्ण बाधित आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com