लॉक डाऊन : शहरातील सातशे पन्नास  कलाकारांवर उपासमारीची वेळ; मदतीसाठी अनेक हातांचा आधार

लॉक डाऊन : शहरातील सातशे पन्नास कलाकारांवर उपासमारीची वेळ; मदतीसाठी अनेक हातांचा आधार

नाशिक : ‘लॉकडाऊन’चा सर्वाधिक फटका राेज काम करून पाेटाची खळगी भरणाऱ्या कुटुंबांना बसला आहे. मागील एक महिन्यापासून कलाकार व वाद्यवृंदाचे काम नसल्याने शेकडो कलाकार हवालदिल झाले आहेत. काही कलाकारांची उपासमार सुरू असल्याने तातडीने मदत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

नाशिकमध्ये जवळपास ७५० पेक्षा जास्त वादक, गायक व अन्य कलाकार असून सर्वच बंद असल्याने त्यांच्या राेजच्या अन्नपाण्याचा प्रश्न गंभीर हाेत चालला आहे. नाशिक जिल्हा आॅर्केस्ट्रा असाेशिएशनने शहरातील दानशुरांच्या मदतीने तातडीने २५० लाेकांना अन्नधान्याचे वाटपही केले आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात ‘लॉकडाऊन’ सुरू आहे. जनजीवन पूर्णपणे असल्याने असंघटित क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. वाद्यवृंदाशी (ऑर्केस्ट्रा) संबंधित कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

शहरात जवळपास ७५० पेक्षा जास्त कलाकार पूर्णवेळ वाद्यवृंदात काम करतात. या कलाकारांना अडचणीच्या काळात मदत करण्यासाठी आणि समन्वय साधण्यासाठी नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असाेशिएशनह ही संघटना स्थापन करण्यात आली. संघटनेचे ५५० नोंदणीकृत सदस्य आहेत; तसेच नोंदणी नसलेल्या कलाकारांची संख्या वेगळी आहे. यात गायक, वादक, निवेदक, ध्वनी व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, संयोजक यांचा समावेश आहे. तब्बल दोन महिने कार्यक्रम नसल्यामुळे कलाकार हवालदिल झाले आहेत. लग्नसराई आणि भीम जयंतीचे सर्वाधिक कार्यक्रम असतात. ‘लॉकडाऊन’मुळे कार्यक्रम हाेणार नाही. परिणामी कलाकारांना घरखर्च भागविणे कठीण झाले आहे.

काही कलाकारांनी संपर्क साधल्यानंतर संघटनेचे संस्थापक उमेश गायकवाड यांनी यांनी मदत देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तातडीची मदत हवी असलेल्या २५० कलाकारांची पहिली यादी तयार करून त्यांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. दानशूर व्यक्ती, संस्था यांच्यासह संघटना मदत करणार आहे. पूर्णवेळ वाद्यवृंदावर अवलंबून असलेल्या कलाकारांनी अडचणीतील धडा समजून बचत करणे आणि उत्पन्नाचे दुसरे स्रोत शोधणे आवश्यक आहे.

सतत असुरक्षित राहणे योग्य नाही, असे कलाकारांनी सांगितले. ऐन कमाईच्या दिवसात घरी असल्यामुळे दैनंदिन खर्च भागवताना पुढील शैक्षणिक वर्षाचा मुलांचा खर्च आणि इतर खर्चला तोंड देण्याचे कलाकारांसमोर आव्हान आहे. घरभाडे भरणेही अनेकांना कठीण झाले आहे.

संस्थेकडून केलेल्या आवाहनास दानशुरांनी प्रतिसाद देणे सुरू केले आहे. लाॅकडाऊनच्या काळात सध्या पाच लाख रूपयांची रक्कम मदत म्हणूण जमा झाली आहे. मे मध्ये लाॅकडाऊन संपल्यावर कलाकारांना हे पैसे राेख स्वरूपात देऊ केले जाणार आहे. अजूनही दानशुरांनी मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन करताे.

उमेश गायकवाड, संस्थापक, ना. जि. आॅ. अ, नाशिक.

मदतीसाठी यांचे हात सरसावले

अशोक कटारिया, आनंद सोनवणे, सतीश बापू सोनवणे, जी. एन. पाटील, विश्वासजी ठाकूर, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, भगवान दोंदे, उदय सांगळे, लोकेशजी शेवडे, अभिनेत्री शीतल अहिरराव, प्रोड्युसर योगेश भोसले, डॉ.कैलास कमोद व डॉ. चेतन पाटील यांनी आर्थिक मदत देऊ केली आहे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com