त्र्यंबकमध्ये स्वीकृत नगरसेवक गायधनी यांचा राजीनामा
स्थानिक बातम्या

त्र्यंबकमध्ये स्वीकृत नगरसेवक गायधनी यांचा राजीनामा

Gokul Pawar

Gokul Pawar

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकचे स्वीकृत नगरसेवक श्रीकांत गायधनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे. यावेळी त्यांच्याबरोबर ऍड शौचे, नगरसेवक विष्णू दोबाडे, माजी नगरसेवक रविंद सोनवणे त्यांच्या समवेत उपस्थित होते.

दरम्यान त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत भाजपची सत्ता असुन गायधनी भाजपचे स्वीकृत नगरसेवक होते.नगरपालिकेत २ नगरसेवक स्वीकृत आहे. त्यातील गायधनी यांनी राजीनामा दिल्याने आता एकच स्वीकृत नगरसेवक राहिला आहे.

गायधनी यांच्या नगरसेवकपदाचा कार्यकाल दोन वर्षाचा झाला असून यानंतर दुसऱ्या प्रतिनिधीस संधी मिळावी यासाठी राजीनामा दिला असल्याचे समजते.

Deshdoot
www.deshdoot.com