Thursday, April 25, 2024
Homeनाशिकएकाच दिवसात १०५ रुग्णांची भर; जिल्ह्याचा आकडा १९८५ वर

एकाच दिवसात १०५ रुग्णांची भर; जिल्ह्याचा आकडा १९८५ वर

नाशिक : जिल्ह्याबरोबर शहरातील करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रविवारी (दि.१४) जिल्ह्यात १०५ नवे बाधित रुग्ण आढळून आले तर यातील ५९ रुग्ण शहरातील आहेत. त्यामुळे जिल्ह्याबरोबर शहराची चिंता वाढली आहे.

दरम्यान गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात करोना बाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. आज नव्याने १०५ रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्याचा आकडा १९८५ वर पोहचला आहे. दिवसभरात जिल्ह्यात १०५ नविन बाधित आढळून आले. त्यात शहरातील वडाळारोड, पखालरोड व पंचवटी परिसरात सर्वाधिक करोनाबाधित आढळून आले. तसेच ग्रामीणमध्ये नविन रुग्ण आढळून आले असून बागलाण तालुक्यातील अजमेर साैंदाणे गावात सर्वाधिक १२ रुग्ण आढळून आले आहेत.

- Advertisement -

काही दिवसांपुर्वी करोनाचे हॉटस्पॉट ठरलेले मालेगाव नियंत्रणात येत असतानाच नाशिक शहर तसेच उर्वरीत जिल्ह्यात मात्र करोनाचा उद्रेक झाला आहे. आज एकाच दिवसात जिल्ह्यात १०५ नव्या करोना रूग्णांची भर पडली. आज शहरासह जिल्ह्यातील ३ रूग्णांचा मृत्यू झाल्याने करोना बळींची संख्या १२१ झाली आहे.

आज रात्रीपर्यंत जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार जिल्ह्याभरात नव्याने १०५ रूग्णांची भर पडली. यामध्ये एकट्या नाशिक शहरात ५९ अहवाल आहेत. यात वडाळानाका ७, वडाळा गाव २, पखालरोड ३, कथडा ३, पोलीस हेडकॉर्टर ३, पेठरोड ५, त्रिमुर्तीनगर ३, पंचवटी, भाभानगर २, लॅमरोड, नाशिकरोड, जुने नाशिक ३, कथडा १, अझाद चौक, कामठवाडा, हिरावाडी, गंगापूररोड, पाथर्डीफाटा, नाईकवाडीपुरा, बिटको कॉलेज, भगुर, उत्तमनगर, शिवाजीनगर, गोसावीनगर, खडकाळी, हमालपुरा, आडगाव, महाराणाप्रताप चौक प्रत्येकी एक येथील रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे नाशिक शहराचा आकडा ६७३ वर पोहचला आहे.

ग्रामिण भागातील ३१ रूग्ण आढळले आहेत. यामध्ये मनमाड अजमेर सौदाणे १२, चटोरी ४, लाखलगाव ३, बोहरी कॅम्प मनमाड २, कोनंबे सिन्नर १, शेणीत १, इगतपूरी १, भरवीर खुर्द १, टाकळी नांदगाव १, गणेशनगर निफाड १, त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे १, हरसुल पोलीस ठाणे १, वावी१ या रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा ३५३ झाला आहे.

तर मालेगावात ५ रूग्ण आढळले असून मालेगावचा आकडा ८७५ वर गेला आहे. तसेच जिल्ह्यात आज २० रूग्ण करोना मुक्त झाले असून बरे होणारांचा आकडा १२४९ वर पोहचला आहे.

दरम्यान जिल्ह्यात आजपर्यंत १५ हजार १३९ स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यातील १२ हजार ८७५ निगेटिव्ह आले आहेत, १९७३ पॉझिटिव्ह आले आहेत. यातील ५५५ पॉझिटिव्ह रूग्ण उपचार घेत आहेत. तर अद्याप ३३९ अहवाल प्रलबिंत आहेत. दरम्यान आज नव्याने १४० संशयित रूग्ण दाखल झाले आहेत. यात नाशिक शहरातील ६६, जिल्हा रूग्णालय १३, ग्रामिण १६, मालेगाव १४, डॉ. वसंतराव पवार रूग्णालय १९, गृह विलगिकरण १२ अशा संशयित रूग्णांचा सामावेश आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार
* एकूण कोरोना बाधित :१९८५
* मालेगाव : ८८७
* नाशिक : ६७३
* उर्वरित जिल्हा : ३५२
* जिल्हा बाह्य ः ७२
* एकूण मृत्यू : १२१
* करोनामुक्त : १२४९

- Advertisment -

ताज्या बातम्या