मनमाड शहरातील करोनाबाधितांची संख्या चार वर
स्थानिक बातम्या

मनमाड शहरातील करोनाबाधितांची संख्या चार वर

Gokul Pawar

Gokul Pawar

मनमाड : शहरात करोनाचा आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने शहरात करोना बाधीत रुग्णांची संख्या ४ झाली आहे. रुग्णाची संख्या वाढत असल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये चिंता आणि भीती निर्माण झाली आहे.

दरम्यान हा रुग्ण आययुडीपी भागातील असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पालिका प्रशासनाने हा परिसर सील केला आहे. शिवाय या भागाला खेटून असलेला डेली भाजीपाला बाजार देखील बंद करण्यात आला आहे.

भारतासह संपूर्ण जगात कोरोनाने धुमाकूळ घातला असून मनमाड पासून अवघ्या ३६ किमी अंतरावर असलेल्या मालेगावात तर करोनाने अक्षरश थैमान घातले आहे. शहरातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना पाळत वेळोवेळी सहकार्य केले.

शहराच्या उंबरठ्यावर आलेल्या करोनाला कोणत्याही परीस्थित शहरात पाय ठेवू द्याचे नाही मात्र मालेगाव मध्ये कर्तव्य बजावीत असताना एका पोलिसाकडून त्याच्या आईला लागण झाल्याचा अहवाल मागे प्राप्त झाला होता. त्यानंतर ३ दिवसा पूर्वी शहरातील आययुडीपी भागातील एका महिलेला करोनाची लागण झाली.

या महिलेचा रिपोर्ट पॉजीटीव्ह आल्यानंतर तिच्या घरातील लोकांचे स्वब घेवून ते तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. स्वबच्या आलेल्या अहवालात या महिलेच्या मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

शहरात सध्या कोरोना बाधीत रुग्णांची संख्या चार झाली असून यात आणखी वाढ होऊन नये अशीच प्रार्थना शहरातील नागरिक करीत आहे .

Deshdoot
www.deshdoot.com