Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकसातपूर : चतकोर भाकरीच्या शोधात भरतोय माणसांचा बाजार

सातपूर : चतकोर भाकरीच्या शोधात भरतोय माणसांचा बाजार

सातपूर : गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेले व्यवहार सुरू झाल्यानंतर आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची सोय करण्याच्या दृष्टीने कष्टकरी कामगार रोजगाराच्या शोधात रस्त्यावर येऊन उभे राहू लागले मागील चार दिवसांपासून पुन्हा एकदा सातपूरला माणसांचा बाजार भरू लागला आहे.

विविध क्षेत्रात लागणाऱ्या मनुष्य बाळासाठी माणसांचा शोध घेण्यात सुविधा व्हावी यादृष्टीने सातपूर परिसरात तीन ठिकाणी माणसांचा बाजार भरला जातो. या ठिकाणी एकत्रितपणे सर्व प्रकारचे कामगार उपलब्ध होत असतात यात गवंडी, मजूर, सुतार, प्लंबर यासह बिगारी काम करणारे कामगार मोठ्या संख्येने एकत्र उभे राहत असतात. आपल्या गरजेनुसार आपण या ठिकाणी माणसांचा रोज ठरवून त्यांना कामावर घेऊन जाऊ शकतो.

- Advertisement -

सातपूर कॉलनी येथील श्रीराम चौक, सातपूर गावातील भोलेनाथ हॉटेल समोर तर सातपूर पोलीस ठाण्यालगतच्या चौफुलीवर या माणसांची मोठी गर्दी जमत असते बांधकाम व्यवसायिक कारखानदार, ठेकेदार व घरगुती काम करणारे नागरिक आपल्या कामासाठी माणसाची गरज या ठिकाणी भागवत असतात.

भल्या सकाळी जेवणाचा डबा हा तशी बांधून ही मंडळी चौकात येऊन उभी राहत असत मात्र काम न मिळाल्यास हाच डबा घरी जाऊन खाण्याशिवाय पर्याय राहत नाही चतकोर भाकरीसाठी व कुटुंबाच्या गुजराण करण्यासाठी भर चौकात स्वतःला उभे करून मांडला जाणारा माणसांचा बाजार खरंच माणसाची किंमत करणारच ठरवणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या