Saturday, April 27, 2024
Homeनाशिकशहरात १०० रुग्ण वाढीचा वेग पोहचला ३ दिवसांवर; नाशिककरांची वाढली चिंता

शहरात १०० रुग्ण वाढीचा वेग पोहचला ३ दिवसांवर; नाशिककरांची वाढली चिंता

नाशिक : करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी व संक्रमीत रुग्णांवर तातडीने उपचार होण्याच्या दृष्टीने आता महापालिका प्रशासनाकडुन सर्व सज्जता आली आहे. असे असले तरी नाशिक महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांत बाधीतांची वाढती आकडेवारीने नाशिककरांची चिंता वाढविली आहे.

शहरात १०० करोना रुग्ण वाढीचा वेग तीन दिवसांवर आल्याने ही वाढती आकडेवारी आता धोकादायक मानली जात आहे. यामुळे आता आरोग्य विभाग, महापालिका प्रशासन, शहर पोलीस व लोकप्रतिनिधींना रस्त्यावर उतरावे लागत आहे.

- Advertisement -

महापालिका क्षेत्रात मार्च महिन्यात करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडुन विविध उपाय योजना सुरु करण्यात आल्या होत्या. यातच केंद्र शासनाने पहिला लॉकडाऊन लागु केल्यानंतर लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात शहरात ६ एप्रिल २०२० रोजी पहिला करोनाचा रुग्ण आढळून आला होता.

दिल्ली आग्रा असा प्रवास करुन शहरात आल्यानंतर त्यांचा संसर्ग झाल्याचे समोर आले. त्यानंतर दिल्ली येथील मरकतहून प्रकरण चांगलेच गाजल्यानंतर मरकत हून नाशिक शहरात काही नागरिक आल्याचे समोर आल्यानंतर आता नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात करोनाचा संसर्ग होण्याची भिती व्यक्त करण्यात आली होती.

मात्र नाशिककरांनी लॉकडाऊनमध्ये बाहेर केलेला प्रवास आणि करोना बाधीत क्षेत्रातून शहरात आलेल्या काही लोकांमुळे नाशिक शहरात करोनाचे संक्रमण सुरु झाले. ६ ते ३१ एप्रिल या २५ दिवसात केवळ १० बाधीत आढळून आले होते. त्यानंतर ०१ ते २५ मे या पंचवीस दिवसाच्या कालावधीत ९० रुग्ण शहरात आढळून आले.

अशाप्रकारे नाशिक महानगरपालिका क्षेत्रात करोनाचे १०० रुग्ण होण्यास ६ एप्रिल ते २५ मे असे ५० दिवस दिवसाचा कालावधी लागला. यावरुन करोना बाधीतांचे होण्यास जवळपासुन दीड महिन्यावरुन जास्त कालावधी लागला. यानंतर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात शहरात वाढत गेला.

२६ मे पासुन करोनाचा आकडा वाढत गेल्यानंतर या महिन्यात शेवटी अर्थात ३१ मे रोजी शहरात तब्बल ३६ रुग्ण वाढले गेले. अशाप्रकारे २६ मे ते ३१ मे या सात दिवसात बाधीतांचा २०० वर पोहचला.

यावेळी केवळ आंठवड्यातच दुसरे बाधीतांचे शतक पुर्ण झाले. त्यानंतर मात्र करोना प्रादुर्भाव मोठ्या झपाट्याने वाढला गेला. यात शहरातील रुग्णांचे तिसरे शतक केवळ ४ दिवसात अर्थात ४ जुन रोजी पुर्ण झाले.

पुढच्या तीन दिवसात अर्थात ७ जुन रोजी बाधीतांचे चौर्थ शतक पुर्ण झाले. त्यानंतर मात्र पुन्हा पुढच्या दिवसात अर्थात १० जुन रोजी रुग्णांचे पाचवे शतक पुर्ण झाले आहे.

अशाप्रकारे प्रथम पन्नास दिवसांनंतर सात दिवसावर बाधीचे शतक पुर्ण झालेले असतांना आता केवळ तीन दिवसात करोना रुग्णांचे शतक होऊ लागले आहे. यावरुन शहरातील रुग्णांचा वाढता वेग गंभीर स्वरुपाचा असुन आता नाशिककरांची अधिक गंभीरतेने याकडे पाहण्याची गरज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या