परप्रांतीयांना घेऊन जाणारा आयशर टेम्पो घोटी सिन्नर हायवेवर उलटला

परप्रांतीयांना घेऊन जाणारा आयशर टेम्पो घोटी सिन्नर हायवेवर उलटला

सिन्नर : भिवंडीकडून ओरिसा येथे मजुरांना घेऊन जाणारा आयशर टेम्पो घोटी सिन्नर हायवेवर उलटला आहे. सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.

दरम्यान भिवंडी कडून ओरिसा येथे ५३ प्रवाशांना घेऊन जाणारा आयशर टेम्पो (एम एच २० ई जी ७९५०) घोटी सिन्नर हायवेवर कॉलनी फाटा परिसरात उलटला. या अपघातात तीन प्रवासी गंभीर तर पाच जण जखमी झाल्याचे समजते.

अपघातातील जखमींना नाशिक येथे हलविण्यात आले आहे. या मजुरांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो मालकाने कामगारांकडून प्रत्येकी चार हजार रुपये असे साधारण दोन लाख रुपये भाडे घेतल्याचे समजते. अपघातानंतर टेम्पो ड्रायव्हर पसार झाला असून कामगारांचे प्रवासी भाडे त्याने परत केले आहे.

येथील पिंपळगांव डुकरेचे सरपंच श्री. भगवान वाकचौरे , भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब कडभाने यांनी तहसीलदार अर्चना पागेरे याच्याशी संपर्क करून तात्काळ दोन बसेसची व्यवस्था केली आहे. वाडीवरहे येथील पाटील लॉन्स येथे मजुरांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com