उपनगर : जयभवानी रोड परिसरात दगडाने ठेचून तरुणाची हत्या
स्थानिक बातम्या

उपनगर : जयभवानी रोड परिसरात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

Gokul Pawar

नाशिक : नाशिकरोड येथील जय भवानी रोडवरिल एका मोकळ्या जागेत तरुणाची दगडाने ठेचून हत्याची केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. प्रशांत वाघ असे मृत युवकाचे नाव आहे.

दरम्यान येथील फर्नांडिस वाडी येथे मोकळ्या मैदानावर हा मृतदेह सकाळच्या सुमारास आढळून आला. यावेळी युवकाच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करून व दगडाने चेहरा ठेचून खून करण्यात आल्याचे समजते. दरम्यान शवविच्छेदनसाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

अज्ञात टोळक्यांकडून हा खून झाल्याचे प्रथमदर्शनी समजते आहे. पुढील तपास उपनगर पोलीस स्टेशन करीत आहे

Deshdoot
www.deshdoot.com