घोटी बाजार समिती आवारात अज्ञात युवकाचा मृतदेह आढळला

घोटी बाजार समिती आवारात अज्ञात युवकाचा मृतदेह आढळला

घोटी : घोटी शहरातील बाजार समितीच्या आवरातील पडीत शौचालयाजवळ एका युवक मृतावस्थेत आढळून आला. या मृत युवकाची ओळख पटलेली नाही त्यामुळे मृत युवक शहर परिसरातला की ग्रामीण भागातला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दोन दिवसांपूर्वी घोटी बाजार समितीच्या आवारात एका अनोळखी युवकाचा मृतदेह पडून असल्याची माहिती घोटी पोलिसांना मिळाली. या मृत युवकाची ओळख न पटल्याने पोलिसांनी याबाबत आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

हा मृत युवक ३५ ते ४० वयोगटातील असून अंगात सफेद रंगाचा शर्ट, निळी हाफ पॅन्ट, गळ्यात रुमाल दाढी मिशा व डोक्यावर केस वाढलेले, शरीराने सडपातळ अशा वर्णनाचा हा मृत युवक आहे.

या मृतयुवकाची ओळख पटविण्याकामी या अज्ञात युवकाबाबत अथवा त्याच्या कुटुंबाबाबत कोणाला माहिती असल्यास घोटी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन ठाणे अंमलदार बिपीन जगताप यांनी केले आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com