दिंडोरी तालुक्यात पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तक वितरण

दिंडोरी तालुक्यात पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तक वितरण

नाशिक : दिंडोरी गटात शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवशी १५ जूनला विद्यार्थ्यांना घरपोच पाठ्यपुस्तक वितरणाचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी दिली.

दिंडोरी तालुक्यात मोफत पाठ्यपुस्तक वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे,बालभारती मंडळातून तालुक्याला इयत्ता पहिली ते आठवीच्या जिल्हा परिषद व अनुदानित शाळेतील ४३ हजार ८०२ विद्यार्थ्यांना २ लाख ४७ ८१६ पुस्तके प्राप्त झाली. तालुका स्तरावर १९ केंद्र प्रमुख यांचे मार्फत शाळा स्तरावर पुस्तके सुरक्षित पोहोच करण्यात आले आहे.१५ जून रोजी विद्यार्थ्यांना कोरोना साथी च्या प्रादुर्भाव असल्याने सुरक्षित पर्यायाचा विचार करून संबंधित शाळेतील शिक्षक घरपोच पुस्तके वितरित करण्यात येणार आहे.

पाठ्यपुस्तक वाटप साठी गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी, सुषमा घोलप, सुभाष पगार, चंद्रकांत गवळी, खंडू सोनार, सुनीता अहिरे, मंगला कोष्टी, केंद्रप्रमुख मोतीराम पवार, तुळशीराम पवार, किसन पवार, पांडुरंग शार्दुल, दिनेश जगताप, राजेंद्र गांगुर्डे, नामदेव गायकवाड , शरद कोठावदे, दादासाहेब ठाकरे, रामदास धात्रक, मीरा खोसे, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक तसेच गट साधन केंद्राचे ज्ञानेश्वर क्षीरसागर, रोहिणी परदेशी, समाधान दाते, दीपक पाटील, अश्विनी जाधव, पौर्णिमा दीक्षित, वैशाली तरवारे, रीना पवार, कल्पना गवळी, योगेश भावसार आदीं प्रयत्नशील आहेत.

पाठ्यपुस्तक वितरणाचे सुष्म नियोजन करण्यात आले असून शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच दिवशी वितरणाच्या सूचना देण्यात आल्या आहे. करोना मुळे सुरक्षित अंतर ठेवून, सॅनिटाझर चा वापर करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.
-भास्कर कनोज,गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती दिंडोरी.

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत पाठ्यपुस्तक वाटप शंभर टक्के विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे,समग्र शिक्षा अभियान मधील सेवक पाठ्यपुस्तक वितरणात महत्वाचे योगदान देत आहे.
-सुषमा घोलप,गट समन्वयक,गट साधन केंद्र,पंचायत समिती दिंडोरी

पुस्तके आकर्षक,उत्कृष्ट छपाई,आवश्यक तेथे क्यूआर कोड, वापरण्यास सुलभ यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तके हातात मिळाल्या नंतर नक्कीच आनंद होईल.
-ज्ञानेश्वर क्षीरसागर, विशेषतज्ज्ञ, पंचायत समिती दिंडोरी

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com