शासकीय कार्यालयांत दहा टक्के कर्मचारी उपस्थिती राहणार; कामाचा वेग वाढणार
स्थानिक बातम्या

शासकीय कार्यालयांत दहा टक्के कर्मचारी उपस्थिती राहणार; कामाचा वेग वाढणार

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : लाॅकडाऊनमधून काही अंशी ढिल देण्यात आली असून शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचारी उपस्थिती पाच टक्क्यांवरुन दहा टक्के वाढविण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारी (दि.२०) जिल्हा प्रशासनासह इतर शासकीय कार्यालयात वर्दळ पहायला मिळाली. मागील एक महिन्यापासून रेंगाळलेल्या कामांच्या फाईलवरील धूळ झटकून ती मार्गी लावण्यास प्राधान्य दिले जात आहे. काम करताना सोशल डिस्टनचे पालन केले जात आहे.

मागील २२ मार्चपासून देशभरात लाॅकडाऊन आहे. करोनाचा संसर्ग व फैलाव टाळण्यासाठि ३ मे पर्यंत लाॅकडाऊन वाढविण्यात आला आहे. मात्र, ठप्प झालेली अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी सोमवारपासून (दि.२०) लाॅकडाउनमधून सूट देण्यात आली आहे. मागील एक महिन्यापासून जिल्हाधिकारीसह जिल्हापरिषद, नगरपालिका, नगर पंचायत, प्रांत, तहसिल व इतर शासकिय आस्थपनांमध्ये पाच टक्के कर्मचारी उपस्थितीवर कामकाज सुरु होते. करोना संसर्गाचा धोका लक्षात घेता शासकीय कार्यालयांमधील कर्मचारी उपस्थिती कमी करण्यात आली होती. मात्र ही उपस्थिती सोमवारपासून दहा टक्क्यांवर नेण्यात आली आहे. शासकीय आस्थपनांमध्ये कर्मचार्‍यांची संख्या वाढल्याने कामकाजाचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात वर्दळ पहायला मिळालि. जिल्हा प्रशासन करोना संकटाशी दोन हात करत आहे. त्या व्यतिरिक्त दुष्काळ निवारण व टंचाई उपाययोजना, आर्थिक ताळेबंद, महसूल वसुली, शेतकरी कर्जमाफी, पीएम किसान सन्मान योजना, मनरेगा काम, शासकिय योजनांचे अनुदान वाटप, जिल्हा नियोजन समितीचा उर्वरति निधी व कामाना मंजुरी देणे या कामांना जिल्हा प्रशासनाकडून प्राधान्य दिले जात आहे. जेणेकरुन ठप्प झालेली यंत्रणा हळूहळू कार्यन्वित होईल व जिल्हयाची स्थिती पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे.

सोशल डिस्टनचे पालन
कर्मचारी संख्या वाढल्याने सोशल डिस्टनचे पालन करावे असे आदेश सर्व आस्थापनांना देण्यात आले आहे. तोंडाला मास्क लावून काम करणे, सॅनिटायझरचा वापर करणे या नियमांचे पालन करावे अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

कर्मचार्‍यांसाठी विशेष पास
सर्वच शासकिय आस्थापनांमध्ये कर्मचार्‍यांना कामावर ये जा करायला लाॅकडाऊनमध्ये अडथळा येऊ नये यासाठी विशेष पास देण्यात आले आहे. रोटेशन पध्दतीने दहा टक्के कर्मचारी उपस्थिती नियमाची अंमलबजावणी केली जात आहे.

महत्वाच्या सूचना
– कामाच्या ठिकाणी गर्दी टाळवी
– मोठी मिटिंग घेउ नये. बसताना ऐकमेकांपासून अंतर ठेवावे
-अभ्यगतांना प्रवेश नाही
– रोटेशन पध्दतीने आलटून पालटून कर्मचार्‍यांना ड्युटि द्यावी
– स्प्रेद्वारे कार्यालय निर्जंतुकीकरन करावे
– लिफ्टमध्ये चार पेक्षा जादा व्यक्ति नसावे

Deshdoot
www.deshdoot.com