Video : अपघातानंतर कंटेनरने घेतला पेट; महामार्गावर वाहतूक कोंडी
स्थानिक बातम्या

Video : अपघातानंतर कंटेनरने घेतला पेट; महामार्गावर वाहतूक कोंडी

Gokul Pawar

Gokul Pawar

नवीन नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर गरवारे पॉईंटनजीक टँकर आणि कंटेनर यांच्यात अपघात झाला. अपघातानंतर कंटेनरला आग लागल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी झाली.

दरम्यान मुंबई महामार्गावर सकाळी 9 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी उड्डाणपुलावर ऑइलच्या टँकरला ओव्हरटेक करत असताना मागील कंटेनरने धडक दिली. यानंतर कंटेनरच्या केबिनमध्ये आग लागल्याने कोंडी निर्माण झाली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने आग विझवण्यास मदत केली. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.

Deshdoot
www.deshdoot.com