Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसामाजिक अंतराचे पालन होईल याची काळजी घ्या; छगन भुजबळ यांची लासलगाव येथे...

सामाजिक अंतराचे पालन होईल याची काळजी घ्या; छगन भुजबळ यांची लासलगाव येथे भेट

नाशिक : करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून अत्यावश्यक वस्तूंची विक्री सुरू असतांना फिजिकल डिस्टन्सचे पालन होईल याची काळजी घ्या, असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. लासलगाव परिसरात पुन्हा कोरोनाचा रुग्ण आढळल्याने मंत्री श्री. भुजबळ यांनी लासलगाव येथे भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

यावेळी मुंबई बाजार समितीचे संचालक, जयदत्त होळकर, प्रांत अधिकारी डॉ.अर्चना पठारे, तहसिलदार दीपक पाटील, लासलगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील आदी उपस्थित होते.

- Advertisement -

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, सोळागाव पाणी पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यात यावा. नागरिकांना वेळच्या वेळी पाणी उपलब्ध करून देण्यात यावे.

नागरिकांना अत्यावश्यक सोयी सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी शासनाच्या नियमावली नुसार उपलब्ध करून देण्यात यावी. विलगिकरण कक्षात आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देत फिजिकल डिस्टन्स राहील याची काळजी घ्यावी ,असे आदेश दिले.

तसेच आपल्या गावाकडे परतणारे कामगार, रस्त्यावर चालणारे नागरिक अत्यंत अडचणीत असून त्यांना कुठेही न अडवता त्यांना आपल्या गावी जाऊ द्यावे, तसेच आवश्यक त्या ठिकाणी रस्त्यात काही अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या